⭕ॲड नाझ शेख यांना "राष्ट्रीय रत्न २०२६" पुरस्कार जाहीर...
नांदेड शहर प्रतिनिधी,राजधानी एक्सप्रेस महाराष्ट्lतील ख्यातनाम वकील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) च्या नेत्या ॲड नाझ शेख यांना या वर्षीचा प्रतिष्ठित "राष्ट्रीय रत्न पुरस्कार २०२६" जाहीर झाला असून आगामी २१ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे एका विशेष सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले जाईल.अशी माहिती 'राजधानी एक्सप्रेस"च्या सुत्रांनी दिली.. विद्यार्थीदशे पासूनच समाजकारणाची आवड असलेल्या ॲड नाझ शेख दीर्घ काळापासून विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय आहेत.कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या सध्या नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयात वकील म्हणून कार्यरत असून,सर्व सामान्य आणि गरजूंना कायदेशीर मदत पुरवण्याचे मोलाचे कार्य करत आहेत.राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे... त्यांच्या या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन सातारा मीडिया चॅरिटेबल फाउंडेशन (ऑल इंडिया) आणि जनसहयोग सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा २१ सप्ट...