Posts

Showing posts from September, 2026

गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत कारतुसासह तरुण अटकेत; वालचंदनगर पोलिसांची धडक कारवाई

Image
 प्रतिनिधी, रसूल पठाण,राजधानी एक्सप्रेस  वालचंदनगर: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुरू असलेल्या गस्तीदरम्यान, वालचंदनगर पोलिसांनी बेकायदेशीरपणे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत कारतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई बेलवाडी फाटा (ता. इंदापूर) परिसरात करण्यात आली.   चेतन राजू लोंढे (वय २० वर्षे, रा. बोरी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.   नेमकी घटना काय? पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या सूचनेनुसार गणेशोत्सवाच्या काळात रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. १७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गस्त घालत असताना, इंदापूर-बारामती रोडवरील बेलवाडी फाटा येथे एक संशयित इसम कमरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.   माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बेलवाडी बस स्थानकाजवळ संशयित तरुणाला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची...

जन्माने अनाथ…पण मृत्यूनंतर माणुसकीने त्याला आपला मुलगा मानले..!

Image
 जन्माने अनाथ… पण मृत्यूनंतर माणुसकीने त्याला आपला मुलगा मानले! “जुबेर आयुष्यभर अनाथ राहिला; निदान अखेरच्या प्रवासात त्याच्यावर बेवारस म्हणून शिक्का बसू देणार नाही”—काका शेळके यांच्या संवेदनशीलतेने प्रत्येकाचे डोळे पाणावले अहिल्यानगर : जन्मदात्या आई-वडिलांचा चेहराही ज्याला आठवत नव्हता, मायेची हाक ऐकण्यासाठी ज्याचे बालपण आसुसलेले राहिले आणि बालगृहाच्या चार भिंतींनाच ज्याने आपले घर मानले—त्या शेख जुबेर मुसा याच्या वाट्याला मृत्यूनंतर पुन्हा एकदा “बेवारस” ठरण्याची वेळ आली होती. मात्र, सिव्हिल हडकोच्या गणेश चौकातील काका शेळके यांच्या हृदयातील माणुसकी जागी झाली आणि त्यांनी जुबेरला मृत्यूनंतरही अनाथ राहू दिले नाही. जुन्नर येथील बालगृह-अनाथालयात जुबेरचे बालपण गेले. इतर मुलांना आई-वडील घरी घेऊन जाताना तो पाहत राहिला; पण त्याच्यासाठी कोणी आले नाही. बालगृहातील मित्रच त्याचे भाऊ बनले आणि तेथील कर्मचारीच त्याचे कुटुंब झाले. वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर बालगृहाचे छतही सुटले. हातात कोणाचा आधार नव्हता, डोक्यावर पालकांचा हात नव्हता; तरीही जुबेरने परिस्थितीपुढे हार मानली नाही. आपल्या मित्रांसह...

⭕अकलूज मधील गरीब फकिरांचे लाखो रुपये लुटून "चौधरी गँग" फरार ⭕"बुल कॅपिटल"च्या नावाखाली करोडोंचा डल्ला...

Image
  अकलूज (विशेष बातमी प्रतिनिधी) अल्लाह आणि प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या पवित्र नावाने दारोदारी मागितलेली भीक आणि सदुभाऊ चौकात वडापावची गाडी चालवून जमवलेली आयुष्याची पुंजी...पण एका भामट्या टोळीने या गरिबांच्या तोंडाचा घास पळवला..! अकलूज आणि परिसरात "बुल कॅपिटल" नावाचा बनावट फंडा चालवून शेकडो निष्पाप नागरिकांना करोडो रुपयांचा गंडा घालणारा मुख्य सूत्रधार नदीम चौधरी आणि त्याची टोळी सध्या फरार झाली असून,या महाठगांना पोलीस कधी बेड्या ठोकणार? असा संतप्त सवाल अकलूजची जनता विचारत आहे... पोटाला मारून साठवलेला पैसा हडपला..! अकलूजच्या व्यंकटनगर येथील अत्यंत हलाखीत जीवन जगणाऱ्या गरीब फकीर कुटुंबाची या टोळीने लाखो रुपयांची फसवणूक केली असून हज यात्रा करून आलेला व धार्मिक आणि प्रामाणिकपणा दाखवणारा नदीम चौधरी प्रत्यक्षात मात्र मोठा "भामटा" निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.आपल्या कष्टाची कमाई आणि आयुष्यभराची पुंजी लुटली गेल्यानंतर या पीडित फकीर कुटुंबाने अत्यंत भावूक होत आपली आपबिती "राजधानी एक्सप्रेस" समोर मांडली आहे... चौधरी गँगचा मास्टरमाईंड "फुफ्फा" ...

⭕इचलकरंजी येथे ४ ऑक्टोबरला 'बागवान वधू-वर परिचय मेळावा २०२६' चे आयोजन

Image
 ⭕इचलकरंजी येथे ४ ऑक्टोबरला 'बागवान वधू-वर परिचय मेळावा २०२६' चे आयोजन राजधानी एक्सप्रेस  बागवान बिरादरीतील विवाह इच्छुक तरुण-तरुणींना योग्य जीवनसाथी मिळण्यास मदत व्हावी,या उद्देशाने "इचलकरंजी शहर बागवान जमियत" आणि "बागवान जमियत बैतुलमाल संस्था" यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार,दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य "बागवान वधू-वर परिचय मेळाव्याचे" आयोजन करण्यात आले आहे... हा मेळावा सांगली रोडवरील बादशाह बजाज शोरूमजवळ असलेल्या "बागवान जमियत मल्टीपर्पज हॉल" इचलकरंजी येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडेल... या मेळाव्यात कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,सोलापूर या महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह बेलगाम,विजापूर,निपाणी,चिक्कोडी,अथणी (कर्नाटक) आणि परिसरातील ग्रामीण व शहरी भागातील बागवान बिरादरीचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत... मेळाव्याची प्रमुख वैशिष्ट्ये व महत्त्वाच्या सूचना... सर्वसमावेशक आयोजन : या मेळाव्यात अविवाह तरुणां सोबतच विधवा,विधुर आणि घटस्फोटितांसाठीही पुनर्विवाहाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे... पूर्णपणे मोफत नोंदणी : या ...

⭕पुतण्यांच्या चेहऱ्यावर उमलला समाधानाचा आनंद...!⭕अकलूजच्या बाजार समितीत डाळिंबाला मिळालेल्या चांगल्या दरामुळे शेतकरी कुटुंब सुखावले...

Image
 राजधानी एक्सप्रेस  सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी एक अत्यंत आनंददायी आणि मन हेलावून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले.आपल्या कष्टाच्या डाळिंबाला मिळालेला चांगला दर आणि हातात आलेली हक्काची रक्कम पाहून,आपल्या चुलत्या सोबत आलेल्या दोन चिमुकल्या पुतण्यांच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद उपस्थितांची मात्र मने जिंकून गेला... सध्या अकलूज मार्केट मध्ये फळांचा राजा मानल्या जाणाऱ्या डाळिंबाची मोठी आवक होत असून त्याला चांगला बाजारभाव मिळत आहे.याच दरम्यान,स्वप्नील गोडसे या डाळिंब उत्पादक शेतकऱ्याने आपल्या शेतातील माल विक्रीसाठी आणला होता.मालाचा लिलाव झाल्यानंतर इम्रानभाई आणि राजूभाई यांच्या "एम एम फ्रूट कंपनी" मध्ये व्यापाऱ्यांकडून डाळिंब विक्रीची पट्टी आणि रोख रक्कम स्वीकारण्यासाठी ते गेले असता,त्यांच्या सोबत त्यांची दोन्ही लहानगी पुतणे सुद्धा उपस्थित होती... आपल्या डाळिंबाचा मिळालेला भरघोस दर आणि व्यापाऱ्यांकडून मिळालेली रक्कम पाहून या चिमुकल्यांचा सुद्धा आनंद गगनात मावेनासा झाला होता,शेतात राबणाऱ्या आपल्या वडिलांचे आणि चुलत्याच्या कष्टाचे चीज झाल्याचे पाहून...

⭕सुमारे १५० खेळाडूंचा सहभाग;जिल्हा क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकड यांच्या हस्ते उद्घाटन...

Image
 ⭕अकलूज येथे जिल्हा स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद... राजधानी एक्सप्रेस  जिल्हा क्रीडा कार्यालय,सोलापूर आणि सदाशिवराव माने विद्यालय,अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेला जिल्ह्यातील खेळाडूंचा भरभरून प्रतिसाद मिळाला.बुधवार,दि.१६ सप्टेंबर रोजी सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या सुमारे १५० खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावले... स्पर्धेचा छोटेखानी उद्घाटन सोहळा जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला...  यावेळी सदाशिवराव माने विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले,उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे,पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे,सुजित कांबळे,तसेच क्रीडा प्रशिक्षक संजय राऊत,भीमाशंकर पाटील व भीमराव दुधाळ हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते... वेटलिफ्टिंग हा खेळ केवळ शारीरिक सामर्थ्याचा नसून त्यात चिकाटी,सातत्य आणि शिस्तीची मोठी कसोटी लागते,अशा खेळात विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग अत्यंत कौतुकास्पद आहे.अशा जिल्हास्तरीय स...

⭕कायदे विषयक जन जागृतीसाठी माळीनगरात कार्यशाळा उत्साहात संपन्न...

Image
राजधानी एक्सप्रेस  माळीनगर परिसरातील नागरिकांमध्ये कायदे विषयक जागरूकता निर्माण व्हावी,नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची व कर्तव्यांची माहिती मिळावी,तसेच सामान्य नागरिकांना न्यायव्यवस्थेची प्रक्रिया समजावी,या उद्देशाने विधीसेवा फाऊंडेशनच्या वतीने कायदेविषयक जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.ही कार्यशाळा रविवार,दि १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह,राममाता कॉलनी,माळीनगर येथे उत्साहात पार पडली... कार्यशाळेत विधीसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड धनंजय बाबर यांनी नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.तसेच फाऊंडेशनचे सचिव ॲड सुमित सावंत यांनीही विविध कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन केले.कार्यशाळेत विधी सेवा फाऊंडेशनची माहिती,उद्दिष्टे व सदस्य नोंदणी,कायदे विषयक जनजागृती,एफआयआर पासून चार्जशीटपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया,तक्रारदाराने काय करावे,तक्रारदारांचे अधिकार,तसेच नागरिकांचे संविधानिक अधिकार व हक्क या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली... यावेळी मार्गदर्शन करताना वक्त्यांनी नाग रिकांनी कायद्याची भीती न बाळगता कायद्याचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सा...

⭕ॲड नाझ शेख यांना "राष्ट्रीय रत्न २०२६" पुरस्कार जाहीर...

Image
नांदेड शहर प्रतिनिधी,राजधानी एक्सप्रेस  महाराष्ट्lतील ख्यातनाम वकील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) च्या नेत्या ॲड नाझ शेख यांना या वर्षीचा प्रतिष्ठित "राष्ट्रीय रत्न पुरस्कार २०२६" जाहीर झाला असून आगामी २१ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे एका विशेष सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले जाईल.अशी माहिती 'राजधानी एक्सप्रेस"च्या सुत्रांनी दिली.. विद्यार्थीदशे पासूनच समाजकारणाची आवड असलेल्या ॲड नाझ शेख दीर्घ काळापासून विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय आहेत.कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या सध्या नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयात वकील म्हणून कार्यरत असून,सर्व सामान्य आणि गरजूंना कायदेशीर मदत पुरवण्याचे मोलाचे कार्य करत आहेत.राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे... त्यांच्या या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन सातारा मीडिया चॅरिटेबल फाउंडेशन (ऑल इंडिया) आणि जनसहयोग सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा २१ सप्ट...

अकलूज येथे जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; १५० खेळाडूंचा सहभाग.क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकड यांच्या हस्ते उद्घाटनाने स्पर्धेचा प्रारंभ

Image
 Rajdhani Express News Network  अकलूज : जिल्हा क्रीडा कार्यालय, सोलापूर आणि सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सदाशिवराव माने विद्यालय येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. या स्पर्धेला जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे १५० हून अधिक खेळाडूंनी यात आपला सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या भव्य उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पूजन करून स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजित कांबळे तसेच क्रीडा प्रशिक्षक संजय राऊत, भीमाशंकर पाटील आणि भीमराव दुधाळ आदी मान्यवर उपस्थित होते. "वेटलिफ्टिंग हा शारीरिक सामर्थ्य, चिकाटी, सातत्य आणि कठोर शिस्तीची कसोटी पाहणारा खेळ आहे. या खेळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग अत्यं...