गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत कारतुसासह तरुण अटकेत; वालचंदनगर पोलिसांची धडक कारवाई
प्रतिनिधी, रसूल पठाण,राजधानी एक्सप्रेस वालचंदनगर: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुरू असलेल्या गस्तीदरम्यान, वालचंदनगर पोलिसांनी बेकायदेशीरपणे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत कारतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई बेलवाडी फाटा (ता. इंदापूर) परिसरात करण्यात आली. चेतन राजू लोंढे (वय २० वर्षे, रा. बोरी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नेमकी घटना काय? पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या सूचनेनुसार गणेशोत्सवाच्या काळात रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. १७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गस्त घालत असताना, इंदापूर-बारामती रोडवरील बेलवाडी फाटा येथे एक संशयित इसम कमरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बेलवाडी बस स्थानकाजवळ संशयित तरुणाला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची...