Posts

⭕ॲड नाझ शेख यांना "राष्ट्रीय रत्न २०२६" पुरस्कार जाहीर...

Image
नांदेड शहर प्रतिनिधी,राजधानी एक्सप्रेस  महाराष्ट्lतील ख्यातनाम वकील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) च्या नेत्या ॲड नाझ शेख यांना या वर्षीचा प्रतिष्ठित "राष्ट्रीय रत्न पुरस्कार २०२६" जाहीर झाला असून आगामी २१ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे एका विशेष सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले जाईल.अशी माहिती 'राजधानी एक्सप्रेस"च्या सुत्रांनी दिली.. विद्यार्थीदशे पासूनच समाजकारणाची आवड असलेल्या ॲड नाझ शेख दीर्घ काळापासून विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय आहेत.कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या सध्या नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयात वकील म्हणून कार्यरत असून,सर्व सामान्य आणि गरजूंना कायदेशीर मदत पुरवण्याचे मोलाचे कार्य करत आहेत.राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे... त्यांच्या या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन सातारा मीडिया चॅरिटेबल फाउंडेशन (ऑल इंडिया) आणि जनसहयोग सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा २१ सप्ट...

अकलूज येथे जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; १५० खेळाडूंचा सहभाग.क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकड यांच्या हस्ते उद्घाटनाने स्पर्धेचा प्रारंभ

Image
 Rajdhani Express News Network  अकलूज : जिल्हा क्रीडा कार्यालय, सोलापूर आणि सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सदाशिवराव माने विद्यालय येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. या स्पर्धेला जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे १५० हून अधिक खेळाडूंनी यात आपला सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या भव्य उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पूजन करून स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजित कांबळे तसेच क्रीडा प्रशिक्षक संजय राऊत, भीमाशंकर पाटील आणि भीमराव दुधाळ आदी मान्यवर उपस्थित होते. "वेटलिफ्टिंग हा शारीरिक सामर्थ्य, चिकाटी, सातत्य आणि कठोर शिस्तीची कसोटी पाहणारा खेळ आहे. या खेळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग अत्यं...