⭕इचलकरंजी येथे ४ ऑक्टोबरला 'बागवान वधू-वर परिचय मेळावा २०२६' चे आयोजन

 ⭕इचलकरंजी येथे ४ ऑक्टोबरला 'बागवान वधू-वर परिचय मेळावा २०२६' चे आयोजन



राजधानी एक्सप्रेस 


बागवान बिरादरीतील विवाह इच्छुक तरुण-तरुणींना योग्य जीवनसाथी मिळण्यास मदत व्हावी,या उद्देशाने "इचलकरंजी शहर बागवान जमियत" आणि "बागवान जमियत बैतुलमाल संस्था" यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार,दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य "बागवान वधू-वर परिचय मेळाव्याचे" आयोजन करण्यात आले आहे...


हा मेळावा सांगली रोडवरील बादशाह बजाज शोरूमजवळ असलेल्या "बागवान जमियत मल्टीपर्पज हॉल" इचलकरंजी येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडेल...


या मेळाव्यात कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,सोलापूर या महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह बेलगाम,विजापूर,निपाणी,चिक्कोडी,अथणी (कर्नाटक) आणि परिसरातील ग्रामीण व शहरी भागातील बागवान बिरादरीचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत...


मेळाव्याची प्रमुख वैशिष्ट्ये व महत्त्वाच्या सूचना...


सर्वसमावेशक आयोजन : या मेळाव्यात अविवाह तरुणां सोबतच विधवा,विधुर आणि घटस्फोटितांसाठीही पुनर्विवाहाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे...


पूर्णपणे मोफत नोंदणी : या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही...


सुविधा व व्यवस्था : मेळाव्यात महिलांसाठी पडद्याची योग्य व्यवस्था असून,उपस्थितांसाठी भोजनाची मोफत सोय करण्यात आली आहे.मुलगा आणि मुलगी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणे सोयीचे ठरेल...


नोंदणी प्रक्रिया व संपर्क :


इच्छुक पालकांनी आपल्या पाल्याचा फोटो आणि जमियतच्या निश्चित फॉरमॅटमधील बायोडाटा PDF स्वरूपात २५ सप्टेंबर २०२६ पूर्वी खालील जिल्हानिहाय क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे पाठवून नोंदणी करणे आवश्यक आहे...


कोल्हापूर जिल्हा : हाफिज फारुक (९८५०२९८९००)


सांगली जिल्हा : शकील भाई (९९२१४५५५३७)


सातारा जिल्हा : अशरफ भाई (७७४१०४०४०५)


पुणे जिल्हा : आयुब भाई (९८९०५६४५३९)


सोलापूर जिल्हा : इम्तियाज भाई (९८९००३१३२८)


बेलगाम जिल्हा : जावेद भाई (९९७५८६७८६६)


विजापूर जिल्हा : फिरोज भाई (९९७०६१४५७६)


बागवान समाजातील सर्व बांधवांनी या पावन कार्यात आणि मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे...

Comments

Popular posts from this blog

⭕अकलूज मधील गरीब फकिरांचे लाखो रुपये लुटून "चौधरी गँग" फरार ⭕"बुल कॅपिटल"च्या नावाखाली करोडोंचा डल्ला...

जन्माने अनाथ…पण मृत्यूनंतर माणुसकीने त्याला आपला मुलगा मानले..!

⭕पुतण्यांच्या चेहऱ्यावर उमलला समाधानाचा आनंद...!⭕अकलूजच्या बाजार समितीत डाळिंबाला मिळालेल्या चांगल्या दरामुळे शेतकरी कुटुंब सुखावले...