⭕शिवकृपा सहकारी पतपेढीच्या सुसज्ज "अकलुज शाखेचा" थाटात उद्घाटन सोहळा संपन्न...

 राजधानी एक्सप्रेस 


महाराष्ट्रातील सहकार चळवळीत दीपस्तंभा प्रमाणे आदर्शवत काम करणाऱ्या शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबईच्या सुसज्ज व वातानुकूलित "अकलुज शाखेचा" भव्य उद्घाटन सोहळा आज,रविवार दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला...


या सोहळ्याचे शुभउद्घाटन प पू म श्री शांतारामगिरी शांतीगिरीजी महाराज (मठाधिपती,गुप्तर्लिंग आश्रम,शिखर शिंगणापूर) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.पतसंस्थेचे संस्थापक व अध्यक्ष गोरख तु चव्हाण यांनी समारंभाचे प्रास्ताविक केले...


कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ रेश्माताई लालासाहेब अडगळे-नगराध्यक्षा,अकलुज नगरपरिषद),शिवतेजसिंह मोहिते पाटील-उपनगराध्यक्ष,अकलुज नगरपरिषद) तसेच पुष्पक राधा किशनजी सारडा-सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था,अकलुज हे उपस्थित होते...


अकलुज शहरातील "अभिनंदन बिल्डिंग" (पहिला मजला,सिटी सर्वे नंबर १०१५) येथील नवीन वातानुकूलित कार्यालयात शाखा निमित्त सकाळी "श्री सत्यनारायण महापूजा" पार पडली.त्यानंतर झालेल्या उद्घाटन सोहळ्यात परिसरातील नागरिक,व्यापारी व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला...


यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरख चव्हाण यांनी पतपेढीच्या प्रगतीचा आलेख मांडत अकलुज व परिसरातील नागरिकांना उत्कृष्ट आणि तत्पर आर्थिक सेवा देण्याचा विश्वास व्यक्त केला...


या सोहळ्यास संस्थेचे संस्थापक व उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी,मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यलक्षी संचालक राजेश शेटे,संचालक मंडळातील सर्व सन्माननीय सदस्य,विभागीय व्यवस्थापक ज्ञानेश्वर बांदल,क्षेत्रिय व्यवस्थापक निलेश वीर,अकलुज शाखा व्यवस्थापक मयुर जगताप यांच्यासह कर्मचारी वृंद,ठेव संकलन प्रतिनिधी आणि नागरिक व पत्रकार बां


धव उपस्थित

Comments

Popular posts from this blog

⭕अकलूज मधील गरीब फकिरांचे लाखो रुपये लुटून "चौधरी गँग" फरार ⭕"बुल कॅपिटल"च्या नावाखाली करोडोंचा डल्ला...

जन्माने अनाथ…पण मृत्यूनंतर माणुसकीने त्याला आपला मुलगा मानले..!

⭕पुतण्यांच्या चेहऱ्यावर उमलला समाधानाचा आनंद...!⭕अकलूजच्या बाजार समितीत डाळिंबाला मिळालेल्या चांगल्या दरामुळे शेतकरी कुटुंब सुखावले...