शिवराणा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न... २५० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ...


 राजधानी एक्सप्रेस 


अकलूज :शिवराणा गणेशोत्सव मंडळ, महाळुंग रोड,अकलूज यांच्या वतीने आज परिसरातील नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला महाळुंग रोड परिसरासह समता नगर,रणजीत नगर,मसूद मळा व तांबोळी वसाहत येथील २०० ते २५० नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला...


सदर आरोग्य शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र माळीनगर अंतर्गत उपकेंद्र अकलूज २ येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत सिंह,पी.एच.सी. माळीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.या प्रसंगी ए.एन.एम. सिस्टर सूर्यांगण,आरोग्य सेवक एच एस काळे,तसेच आशा स्वयंसेविका आर.ए. घोंगडे,आर.एस. एवढे,व्ही.एस. सावंत,एस.जी. जगताप,ए एल सदाफुले आणि आर ए सातव यांनी नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली.या शिबिरा दरम्यान नागरिकांची रक्तदाब (BP),रक्तगट (Blood Group) व साखरेची (Sugar) तपासणी करण्यात आली.तसेच सर्दी,ताप,खोकला व इतर किरकोळ आजारांवर मोफत वैद्यकीय निदान करून मार्गदर्शन करण्यात आले...


या उपक्रमास सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम एल गायकवाड सर,तत्कालीन अकलूज ग्रामपंचायतचे माजी सदस्य जावेद बागवान आणि टाइम्स 9 चे नौशाद मुलाणी यांनी विशेष भेट देऊन आरोग्य तपासणीचा लाभ घेतला व मंडळाच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले...


शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवराणा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सागर लक्ष्मण सावंत,उपाध्यक्ष रोहन मयूर सावंत,सचिव आर्यन मोहन चव्हाण,खजिनदार प्रथमेश रुपेश पवार,कार्याध्यक्ष यश उमेश पवार यांच्यासह सदस्य सत्यम चव्हाण,शिवदत्त चव्हाण,आर्यन सावंत,विराज सावंत,स्वराज्य सावंत,स्वराज्य ढेरे पाटील,आदिल शेख,उमेश पवार,रुपेश पवार,उदय कुमार साळुंखे,रेहान मुलाणी आणि तोसिफ शेख यांनी विशेष परिश्रम घेतले...


गणेशोत्सवाचे औचित्य साधून शिवराणा गणेशोत्सव मंडळाने राबवलेल्या या स्तुत्य व सामाजिक उपक्रमाबद्दल अकलूज व पंचक्रोशीतून मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे जोरदार कौतुक केले जात आहे...

Comments

Popular posts from this blog

⭕अकलूज मधील गरीब फकिरांचे लाखो रुपये लुटून "चौधरी गँग" फरार ⭕"बुल कॅपिटल"च्या नावाखाली करोडोंचा डल्ला...

जन्माने अनाथ…पण मृत्यूनंतर माणुसकीने त्याला आपला मुलगा मानले..!

⭕पुतण्यांच्या चेहऱ्यावर उमलला समाधानाचा आनंद...!⭕अकलूजच्या बाजार समितीत डाळिंबाला मिळालेल्या चांगल्या दरामुळे शेतकरी कुटुंब सुखावले...