गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत कारतुसासह तरुण अटकेत; वालचंदनगर पोलिसांची धडक कारवाई

 प्रतिनिधी,


रसूल पठाण,राजधानी एक्सप्रेस 

वालचंदनगर: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुरू असलेल्या गस्तीदरम्यान, वालचंदनगर पोलिसांनी बेकायदेशीरपणे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत कारतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई बेलवाडी फाटा (ता. इंदापूर) परिसरात करण्यात आली.  

चेतन राजू लोंढे (वय २० वर्षे, रा. बोरी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  


नेमकी घटना काय?

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या सूचनेनुसार गणेशोत्सवाच्या काळात रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. १७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गस्त घालत असताना, इंदापूर-बारामती रोडवरील बेलवाडी फाटा येथे एक संशयित इसम कमरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.  


माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बेलवाडी बस स्थानकाजवळ संशयित तरुणाला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या पॅन्टमध्ये लपवलेले बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तूल आणि खिशात एक जिवंत कारतूस मिळून आले. पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त केला आहे.  


या प्रकरणी पोलीस हवालदार गणेश काटकर यांच्या फिर्यादीवरून वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २९४/२०२६ नुसार आर्म ॲक्ट कलम ३(२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश झारेकर करत आहेत.  



ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे, पोलीस हवालदार गणेश काटकर, गणेश झारेकर, किर्तीलाल गायकवाड, अमोल गायकवाड, पोलीस अंमलदार विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, अभिजीत कळसकर आणि अजित राऊत यांच्या पथकाने केली.  

सदर कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे.

Comments

  1. खुप छान कारवाई.असेच काम करत रहा वालचंद नगर पोलीस स्टेशन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

⭕अकलूज मधील गरीब फकिरांचे लाखो रुपये लुटून "चौधरी गँग" फरार ⭕"बुल कॅपिटल"च्या नावाखाली करोडोंचा डल्ला...

जन्माने अनाथ…पण मृत्यूनंतर माणुसकीने त्याला आपला मुलगा मानले..!

⭕पुतण्यांच्या चेहऱ्यावर उमलला समाधानाचा आनंद...!⭕अकलूजच्या बाजार समितीत डाळिंबाला मिळालेल्या चांगल्या दरामुळे शेतकरी कुटुंब सुखावले...